Monday, April 6, 2026
HomeTop Newsमंगळवार व बुधवार या दोन दिवसात १०९ जण कोरोना बाधित ;...

मंगळवार व बुधवार या दोन दिवसात १०९ जण कोरोना बाधित ; आज एक कोरोना बाधिताचा मृत्यू ;

 जावली तालुक्यात  तेवीस दिवसात ७६०  जण कोरोना बाधित ; २० जणांचा  मृत्यू आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू  ; मंगळवारी ६४ तर बुधवारी  ४५ जण कोरोना पाँझिटीव्ह ;

एकूण – १५०३ , डिस्चार्ज १०९०, बळी ४० ,अँक्टिव्ह ३७२

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज सांगवी तर्फ कुडाळ येथील ६७ वर्षीय पुरुषाचा  कोरोना मुळे मृत्यूची नोंद झाली आहे.तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा आता ४० वर पोहचला आहे. सप्टेंबर महिन्यात आज दि.२३ अखेर ७५२ जण कोरोना पाँझिटीव्ह झाले आहेत. तर २० कोरोना बाधित व्यक्तींचा मृत्यू  झाला आहे..

मंगळवार व बुधवार या दोन दिवसात  १०९ जण कोरोना बाधित  ;

मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात तालुक्यातील ६४ पाँझिटीव्ह ;  यामध्ये  मेढा 10, मोरघर 1, माहीगाव 1, आनेवाडी 3, सोनगाव 3, निझरे 3, रिटकवली 2, भणंग 9,  ओझरे 1, सोमर्डी 1,कारगाव 1, सरताळे 1, बेलोशी 4, शिंदेवाडी 3, हूमगाव 3, सायगाव 3,सर्जापुर 16,  आंबेघर 1, वहागाव 1, बिभवी 1.यांचा समावेश आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

आज बुधवारी  ४५ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

         जावली तालुक्यात आज  ४४ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. या मध्ये जवळवाडी १०, मेढा ७, सायगांव १, खर्शीबारामुरे ४, कुडाळ ८, आलेवाडी १, महिगाव ४,करंजे १, म्हाते खु.१, आंबेघर १, पवारवाडी २, म्हाते बु. १, सांगवी १, वरोशी १  एकूण ४३ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली आहे.तसेच करंदी तर्फ कुडाळ येथील दोन जणांचा अहवाल आज अँन्टीजेन टेस्ट मध्ये कोरोना पाँझिटीव्ह आला असल्याची माहिती सायगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वळवी यांनी दिली आहे.

जनतेने अधिक सतर्क रहावे – तहसीलदार

       सप्टेंबरमध्ये कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे लोकांनी घरातील व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. माझे घर माझी जबाबदारी हे तत्व पाळावे. तसेच आरोग्य तपासणी साठी येणाऱ्या शासकीय यंत्रनेला सहकार्य करावे .कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क करावा. असे आवाहन तहसीलदार शरदपाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page