Thursday, February 19, 2026
HomeTop Newsमकर संक्रांतीला बनवा नाविन्यपूर्ण तिळगुळाची वडी

मकर संक्रांतीला बनवा नाविन्यपूर्ण तिळगुळाची वडी

https://youtu.be/2XPp4oie5zg
तिळगुळ वडी रेसिपी
जानेवारी महिना सुरु झाला आहे त्याबरोबरच नवीन वर्षातील सण उत्सवांना हि सुरुवात होणार आहे. जानेवारी महिना वर्षातील पहिला हिंदू सण मकर संक्रांती घेऊन येतो.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.
तर यासाठीच आम्ही तुमचा साठी घेऊन आलो आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी तिळाची वडी रेसिपी.ही रेसिपी आवडल्यास लाईक व शेअर करा.आमच्या विविध प्रकारच्या शाकाहारी रेसिपीज पाहण्यासाठी हा चँनल सबस्क्राईब करा.

https://youtu.be/2XPp4oie5zg

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page