मेढा / प्रतिनिधी .
गेले आठ महिने कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूने महाराष्ट्रात थैमान घातले असून हातावर पोट असणाऱ्या व रोज काम धंदा करून आपला उदरनिर्वाह भागवणाऱ्या बेलदार समाजातील बहुतांश समाजबांधवांवर उपासमारीची वेळ आली असून बेलदार समाजाला आर्थिक मदत मिळावी असे निवेदन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाजाचे राज्य प्रदेश प्रवक्ते, प्रसिद्धी प्रमुख व सातारा जिल्ह्याचे युवा अध्यक्ष श्री नारायण जाधव यांनी दिले .
यावेळी सातारा – जावलीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले , विक्रम पावसकर, श्रीहरी गोळे यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले निवेदनात पुढे म्हणण्यात आले आहे बेलदार समाजाला आर्थिक मदत मिळण्याबरोबरच बेलदार समाजाचा प्रमुख व्यवसाय बांधकाम करणे व दगड फोडणे हा असुन गेले आठ महिन्यान संपूर्ण काम धंदा बंद आहे . त्यामुळे शासनाने गांभिर्यपूर्वक विचार करून आर्थिक मदत करावी व बेलदार समाज हा भटका असल्याने अनेक समाज बांधवांना जातीचे दाखले काढण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणींबरोबरच बेलदार समाजाचा गाव निहाय सर्वे करण्यात यावा व जनगनना करण्यात यावी त्याबरोबरच बेलदार समाजाचा इतर राज्याप्रमाणे एस् टी प्रवर्गात समावेश करण्यात यावा यासाठी आपण विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते म्हणून आवाज उठवून बेलदार समाजाला न्याय द्यावा अशा अशयाचे निवेदन नारायण जाधव यांनी दिले .
फोटो : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर व आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेच्या वतीने देताना नारायण जाधव आदी .
