Thursday, February 19, 2026
HomeTop Newsमहू धरणात बुडालेला प्रणव ३० तास प्रयत्न करुनही सापडेना ; महाबळेश्वर ट्रेकर्स...

महू धरणात बुडालेला प्रणव ३० तास प्रयत्न करुनही सापडेना ; महाबळेश्वर ट्रेकर्स च्या जवानांकडून शोध सुरू

महू धरणात बुडालेला प्रणव ३० तास प्रयत्न करुनही सापडेना ; महाबळेश्वर ट्रेकर्स च्या जवानांकडून शोध सुरू 

कुडाळ : महू धरणात सोमवारी दुपारी   पोहण्यासाठी गेलेल्या प्रणव संतोष गोळे (वय ११) हा मुलगा अचानक पाण्यात बुडाला.गेले दोन दिवस ग्रामस्थ व महाबळेश्वर ट्रेकर्स चे जवान प्रणवचा शोध घेत आहेत.आज सलग दुसऱ्या दिवशी प्रणवला शोधण्यात अपयश आले.अखेर आज सायंकाळी शोध मोहीम थांबवण्यात आली.

             अकरा वर्षांचा हा चिमुरडा काही चमत्कार घडून कुठून येईल आणि आपल्या मिठीत येईल अशी भाबडी अपेक्षा धरुन त्याच्या आई,वडिल, कुटुबियांसह सारा महू गाव गेले दोन दिवस धरणाकाठी बसून आहे.एकुलता एक असणारा पोटचा गोळा गमावलेल्या माता पित्यांचा आक्रोश हृदय पिळवटुन टाकणारा होता.

           कालपासून सपोनि अमोल माने , पीएसआय महेश कदम परिस्थिती वर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. महू धरणात पाणी साठा मोठ्या प्रमाणात असल्याने शोध कार्यात अडथळा येत आहे.आज धरणातील पाणी सोडून पाणी पातळी कमी करण्यात आली.महाबळेश्वर ट्रेकर्स होडीतून पाण्यातील कॅमेर्यांच्या  सहाय्याने  शोध घेत संपूर्ण धरण  पिंजून काढत आहेत.संपूर्ण परिसरातील महिला व अबालवृद्ध धरणाच्या तीरावर शोकमग्न अवस्थेत प्रणवची वाटपहात बसून आहेत. आज सायंकाळी शोध मोहिम थांबवण्यात आली असून उद्या सकाळी पून्हा शोध घेण्यात येणार आहे अशी माहिती सपोनि अमोल माने यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page