Saturday, April 11, 2026
HomeTop Newsमहू धरणात बुडालेल्या प्रणवचा मृतदेह अखेर सापडला ;

महू धरणात बुडालेल्या प्रणवचा मृतदेह अखेर सापडला ;

कुडाळ : महू धरणात सोमवारी दुपारी  पोहण्यासाठी गेलेला प्रणव संतोष गोळे (वय ११) हा मुलगा पाण्यात बुडाला होता .गेले दोन दिवस ग्रामस्थ व महाबळेश्वर ट्रेकर्स चे जवान प्रणवचा शोध घेत होते.परंतु प्रणवच्या ठावठिकाणा लागत नव्हता. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रणवच्या मृतदेह पाण्यावर तरंगत असताना सापडला आहे.अशी माहिती पीएसआय महेश कदम यांनी दिली.

           प्रणवच्या मृतदेह सापडल्याचे समजताच संपूर्ण महू गाव धरणाकडे लोटला.यावेळी त्याच्या आई-वडिलांना कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणाराआक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली.सदर घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे.

                  गेले दोन दिवस  सपोनि अमोल माने , पीएसआय महेश कदम परिस्थिती वर बारकाईने लक्ष ठेवून होते. उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी ही घटनास्थळी भेट दिली होती.महाबळेश्वर ट्रेकर्स चे जवान व ग्रामस्थ प्रणवच्या शोध घेत होते . अखेर आज सकाळी प्रणवच्या मृतदेह पाण्यावर तरंगत असताना सापडला.      

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page