मार्ली घाटातील मृतदेह पतीपत्नीचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
पोलिसांकडून लवकरच आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळल्या जाणार
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावळी तालुक्यातील कुडाळ ते मेढा दरम्यान मालदेव खिंडीपासून जाणाऱ्या मार्ली घाटात वीस दिवसापूर्वी एका पुरुषाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी एका महिलेचा सापडलेला मृतदेह हे दोन्ही मृतदेह पती-पत्नीचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान याघटनेबाबत पोलिसाच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील असे खात्री लायक व्रत्त आहे.
त्यामुळे या दोघांना मार्ली घाटात आणून कोणी मारले की त्यांनी आत्महत्या केली असा सवाल आता पोलिसांच्या समोर उपस्थित झाला आहे .या सर्व घटनेमुळे जावली तालुक्यात चांगलीच खळबळ माजली आहे.
जावळी तालुक्यातील निसर्ग रम्य वघनदाट अरण्याने व्यापलेल्या मार्ली घाटात वर्दळ अत्यंत कमी असते. या घाटामध्ये क्वचित एखादी दुसरी वाहन दिसून येते .अशा निर्मनुष्य ठिकाणाचा फायदा घेत हे अमानुष हत्याकांड झाले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
ऑगस्ट महिन्याच्या ११ तारखेला पहिला मृतदेह पोलिसांना याघाटात सापडला होता त्याची ओळख पटली नाही . या ठिकाणी च दुसरा मृतदेह सापडेपर्यंत नेमकं काय घडलय याचा थांगपत्ता पोलिसांना लागला नाही मात्र २९ ऑगस्ट ला एका महिलेच्या हाडाचा सापळा पोलिसांच्या निदर्शनास आला त्या वेळी पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. याबाबत पोलिसांनी यंत्रणा फिरवताच सदर दोन्ही मृतदेह हे पती-पत्नीचे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
त्यामुळे या दोन्ही घटनेबाबत गूढ वाढले आहे.हा खून आर्थिक कारणाने झाला की काय?किंवा अन्य कारण या खुनाच्या पाठीमागे आहे या तपासाला आता पोलिसांच्या समोर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . दोन्ही मृतदेहाचे पोस्टमार्टम चे रिपोर्ट अद्यापही पोलिसांना मिळाले नाहीत
पोस्टमार्टम चा रिपोर्ट मिळाल्यानंतर या दोन्ही मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे .अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सूर्यकांत शिंदे,करहर पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार डी.व्ही शिंदे करीत आहेत.