फसवणूकीच्या गुन्ह्यातील अनोळखी आरोपींना निष्पन्न करून केले जेरेबंद. मेढा पोलिसांची जबरदस्त कारवाई
सूर्यकांत जोशी कुडाळ – मेढा पोलीस ठाणे हद्दीत मौजे अंधारी ता.जावली जि.सातारा येथील श्री. रामचंद्र विठ्ठल शेलार व त्यांचे भाऊ लक्ष्मण रखमाजी शेलार यांचे जमिनीचा खरेदी दस्त त्यांचे ऐवजी दुसरे तोतया इसम उभे करून जमिनीचा खरेदी दस्त दुय्यम निबंधक कार्यालय मेढा येथे करून फसवणूक केलेबाबत श्री. रामचंद्र विठ्ठल शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेढा पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करणेत आलेला होता.
गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीकडे केले चौकशीमध्ये आणखी १० आरोपींची नावे निष्पन्न करणेत आलेली आहे. परंतु जमिनीचे मुळ मालक (फिर्यादी व साक्षीदार ) यांचे ऐवजी बनावट खरेदी दस्त करतेवेळी उभ्या केलेल्या तोतया इसमांची माहीती मिळून येत नव्हती. तद्नंतर सदर तोतया इसमापैकी एक इसम संपत हरिबा कदम याचे नाव निष्पन्न झालेने त्याला ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपुस करून इतर आरोपींची नावे निष्पन्न केली. त्याप्रमाणे सदर आरोपी व यापुर्वी निष्पन्न झालेले आरोपी १) रविंद्र पांडूरंग शेलार रा. अंधारी ता.जावली २) संतोष बंडू सावंत रा. उंबरेवाडी पोस्ट अंधारी ता. जावली, ३) विजय सदाशिव कदम रा.आपटी ता.जावली ४) संपत हरिबा कदम रा. आपटी ता.जावली याना अटक करणेत आली असून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेणेत आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री. संतोष तासगांवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक साो सातारा, मा.श्रीमती आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक साो सातारा, मा.श्री.बाळासाहेब भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांचे मार्गदर्शनाखाली केली असून सदर कारवाईमध्ये श्री. संतोष तासगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे, विकास गंगावणे सहा. पो. फौजदार, पो.कॉ. सनी काळे ब.नं.२५२६ यांनी सहभाग घेतलेला आहे.