सूर्यकांत जोशी कुडाळ -कर्तव्य सोशल ग्रुप व सौरभ बाबा मित्र समुहाच्या माध्यमातून व पुणे येथील संचेती हॉस्पिटल च्या सहकार्याने आयोजित शिबिराच्या माध्यमातून जावली तालुक्यातील जनतेला चांगली संधी उपलब्ध झाली आहे.ग्रामीण भागातील महिलांना व वयोवृद्ध लोकांना शहरात जाऊन आजाराचे निदान करणे शक्य होत नाही. ती संधी या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. कर्तव्य सोशल ग्रुपने आजवर सामाजिक बांधिलकी जपत विविध शिबिराच्या माध्यमातून जनतेला लाभ दिला आहे.कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याचा राजकारणासाठी कुठेही वापर केला जात नाही.सामाजिक कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेले हे शिबीर रुग्णांना वरदान ठरेल असे प्रतिपादन आ. श्री. छ.शिवेंद्रसिंह राजें भोसले यांनी केले.याशिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
कुडाळ येथे आयोजित अस्थीरोग निदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी आ. शिवेंद्रराजे बोलत होते. कार्यक्रमाला प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, व्हा. चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर,बाजारसमितीचे सभापती जयदीप शिंदे,माजी चेअरमन राजेंद्र शिंदे,सरपंच सुरेखा कुंभार,कुडाळ सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे, मछिंद्र मुळीक,यावेळी राजेंद्र फरांदे पाटील यांची प्रतापगड कारखाना स्वीकृत संचालक पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
प्रतापगड कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करा
आ. शिवेंद्रसिंह राजें म्हणाले, अजिंक्य तारा कारखान्याच्या माध्यमातून लवकरच प्रतापगड कारखाना सुरु करत आहोत. यामध्ये विराधकांनी राजकारण नं करता प्रतापगड कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे. बाहेरील कारखान्याला ऊस देऊ नये. जावली तालुक्याच्या हक्काचा असणारा हा कारखाना चांगला चालला पाहिजे.प्रतापगड कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढून तो स्वबळावर चालण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.
कुडाळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती साठी 20 लाखाचा निधी दिला असून अजून चाळीस लाखांचा निधी मिळणार आहे.कुडाळ गावाला सुद्धा विकास कामांसाठी भरीव निधी दिला असल्याचे आ. शिवेंद्रसिंह राजेंनी यावेळी सांगितले.
प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभ शिंदे म्हणाले सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचणी मुळे अनेकदा तज्ज्ञ डॉक्टर्स कडून उपचार घेणे शक्य होत नाही. अशा लोकांना आपल्या आजाराचे निदान होऊन योग्य उपचार या शिबिराच्या माध्यमातून मिळतील. आ. शिवेंद्रसिंहराजें भोसले यांच्या माध्यमातून जावली तालुक्याचा चौफेर विकास झाला आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत बाबांना जावाळीतालुक्यातून भरघोस मतदान देण्याची जबाबदारी आपली आहे.आगामी निवडणुकीत जावली तालुक्यातून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयन्त केले पाहिजेत.याशिबिरासाठी कुडाळचे सामाजिक कार्यकर्ते अतुल बावकर यांनी विशेष सहकार्य केल्याचे सौरभ शिंदे यांनी सांगितले.
डॉ. अय्यर म्हणाले रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. संचेती हॉस्पिटच्या माध्यमातून महाराष्ट्र भर शिबीर आयोजित केले जातात. हॉस्पिटल च्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याचे संचेती हॉस्पिटलचे डॉ. अय्यर यांनी सांगितले. यावेळी, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे व ऍड शिवाजीराव मर्ढेकर यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक संदीप परामणे यांनी केले.यावेळी डाँ सिध्दार्थ अय्यर, डाँ. अर्जून उन्नम, डाँ प्रतिक तिवारी, डाँ.सनद सोनावणे , फिजिआोथेरपिस्ट कोमल सिंग, तन्वी ढवळे, दिगंबर माळी, सोमनाथ नवघणे आदी डाँक्टरांनी निशेष परिश्रम घेतले.