सूर्यकांत जोशी कुडाळ – दादागिरी विरोधात संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. अगदी कम्युनिस्ट पक्षाचा असला तरीही त्यांचे अभिनंदन करण्यासाठी जाणारच. ज्ञानदेव रांजणे यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी च्या दादागिरीला न जुमानता धैर्याने संघर्ष केला म्हणून त्यांचे कौतुक करण्यासाठी आलो आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
आंबेघर तर्फे मेढा येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,जिल्हा परिषद सदस्या सो.आर्चना रांजणे,भाजपा जिल्हा ध्यक्ष विक्रम पावसकर जिल्हा परिषद सदस्य मच्छिंद्र क्षिरसागर, भाजपा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल देशपांडे, नगरसेवक विकास देशपांडे,गिताताई लोखंडे, तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे जयदीप शिंदे ,मोहन कासुर्डे उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद निवडणुका पक्षाच्या पातळीवर लढवणे अपेक्षित आहे.तरीही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा राहील असेही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकार पडेल असे विरोधी पक्ष म्हणून आम्ही म्हणत असलो तरीही योग्य वेळी ते आपोआप घडेल असेही पाटील यांनी पञकारांशी बोलताना स्पष्ट केले.

