
सूर्यकांत जोशी कुडाळ – सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत हुमगाव ते बावधन या रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या आदेश .सर्व शासकीय अधिकारी यांना दिले.तसेच इतर सर्व बाबी पूर्णत्वास आणाव्यात अशा सूचना दिल्या. यासाठी खाजगी plan तयार करून रस्ता बदल करण्यात आला आहे. तसेच घाटातील वळण रस्ता न घेता बाबाराजे यांनी बोगदा करावा अशा सूचना केल्या.

या बैठकीत मध्ये बाबाराजेंनी विविध विकासकामांबाबत अत्यंत अभ्यासू पणे अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या बैठकीत बाबाराजेंच्या अभ्यासू तसेच दूरदृष्टी असणारे नेतृत्वगुणांचे पैलू उपस्थितांना जवळून पाहायला मिळाले. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांची तालुक्यातील विविध विकास कामांच्या बाबत मंत्रिमहोदयांच्या मागे असणारी चिकाटी आणि कौशल्य वाखाण्याजोगे होते. भाजपाचे मंडल अध्यक्ष संदीप परामणे यांनी विशेषता म्हसवे गटातील विकास कामे प्रकर्षाने यावेळी मांडली.तालुक्यातील सर्व भागातील पदाधिकारी, अधिकारी व लाभधारक यांनी जबाबदारी ने मंजूर कामाला गती द्यावी व ही कामे ठेकेदाराकडून दर्जेदार करून घ्यावीत अशी अपेक्षा नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली. तालुक्यातील विकास कामाबद्दल लवकरच कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल अशी माहिती संदीप परामने यांनी दिली आहे.
