१४ ऑक्टोबर २०२५ — महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या योजनेअंतर्गत महिलांनी आपले e-KYC अनिवार्यपणे पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, आतापर्यंत राज्यातील १ कोटी १० लाखांहून अधिक महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. दररोज लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी होत असून, सरकारकडून महिलांना योजनेंतर्गत मिळणारा ₹१,५०० चा मासिक लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे.
हे ही वाचा – लाडकी बहीण योजनेच्या ₹1500/- च्या हप्त्यासाठी ‘हा’ नवा नियम लागू ! लगेच करा ‘हे’ काम, नाहीतर…
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक महिलांनी e-KYC पूर्ण केले, तर ग्रामीण भागात ही प्रक्रिया झपाट्याने सुरू आहे. पूरग्रस्त भागातील महिलांना १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, सर्व पात्र लाभार्थ्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांनी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते यांची पडताळणी करून ऑनलाइन किंवा अधिकृत केंद्रांवरून e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा लाभ वितरणात अडथळा येऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


