
(अजित जगताप)
केळघर दि: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीने साथ देण्यासाठी विधानसभा, नगरपरिषद, महानगरपालिका निवडणुकीत यश मिळवून दिले. त्यामुळे सेनेच्या पाठीमागे मतदार महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला.. हे जावळी तालुक्यातील सिद्ध होईल. असे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केळघर ता. जावळी येथे झालेल्या जाहीर सभेत विश्वास व्यक्त केला.
यावेळी सभेला उपस्थित असलेल्या मतदार लाडक्या बहिणीसह शिवसैनिकांनी व ग्रामस्थ मतदारांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. कुसुंबी जिल्हा परिषद गटासह जावळी तालुक्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारानिमित्त केळघर या ठिकाणी जाहीर सभेमध्ये ते बोलत होते .
या वेळेला शिवसेना ज्येष्ठ नेते व माजी आमदार दगडू सपकाळ, संपर्क महिला प्रमुख रेश्मा जगताप, संपर्कप्रमुख शरद कणसे, अतिश कदम, सौ.सुनिता दुंदळे, विठ्ठल गोळे,
साहिल शिंदे, सौ. कविता ओंबळे,रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय गाडे, विठ्ठल पवार ,अशोक सपकाळ, सुशांत मोरे, सुनील गोळे, बापूराव पार्टे , विलास दुंधळे,
आनंदराव जुनघरे व सातारा कराड आणि जावळी तालुक्यातील शिवसैनिक या जाहीर सभेला उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता नवीन पर्व सुरू झालेला आहे पूर्वी चुनावी जुमला समजून लाडक्या बहिणींना योजनेतून पैसे मिळवण्यात विरोध करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले .एवढेच नव्हे तर सावत्र भाऊंनी खोडा घातला. म्हणून मतदानाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी २३२ चा जोडा दाखवला. अनेक ठिकाणी महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत. आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना निवडून देण्याची जबाबदारी माता-भगिनी मतदारांनी पार पाडावी. अशी विनंती त्यांनी केलेली आहे. जावळी तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सामान्य माणसांचे प्रश्न सोडवल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या विचाराचा वारसा जपणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने सत्तेमध्ये सहभागी झालेलो आहोत. बोंडरवाडी धरण व इतर सर्व प्रश्नांची उजळणी शिवसेना नेते एकनाथ ओंबळे यांनी आठवण करून दिली. यावेळी राम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते उपस्थित होते.
_________________________________
फोटो– केळघर या ठिकाणी शिवसेनेच्या प्रचार सभेत मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे (छाया– निनाद जगताप, केळघर)
_________________________________