विना मास्क फिरणाऱ्यां वर भुईज परिसरातील १०१ जणांवर कारवाई करत ५० हजाराचा दंड वसूल
कुडाळ प्रतिनिधी
सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी ने थैमान घातले असून सातारा जिल्ह्यामध्ये कोरोणा बाधितांच्या आकडा वीस हजाराच्या पार गेला असून अजूनही लोकांना कोरोणा ची भीती व गांभीर्य नसल्या कारणामुळे काहीजण विना मास्क व सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यानवर सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते , व dysp अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली भुईज पोलीस स्टेशनचे स.पो.नि शाम बुवा व सहकाऱ्यांनि अचानक पणे मोहीम राबवून जनतेमध्ये मास्क बाबत जनजागृती करणे तसेच ज्यांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणाऱ्यान वर भुईज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भुईंज, पाचवड, आनेवाडी, टोल नाका, जोशिविहिर, वेळे, या परिसरात विना मास्क फिरणारे १०१ लोकांच्या विरोधात कारवाई करत प्रत्येकी ५00 प्रमाणे एकूण ५० हजार ५00 रुपयांचा दंड वसूल केला असून सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणारे पोलीस स्टेशन हद्दीतील 23 हॉटेल मालक व किराणा दुकानदार यांच्यावर कारवाईचा दणका देण्यात आला असून दोन इसमांच्या विरोधात १४८ कलमानुसार गुन्हा ही दाखल दाखल झाला आहे .
या कारवाईमुळे भुइंज परिसरा मध्ये आता चांगलंच वीणा मास्क व सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल असून लोकांपर्यंत मेसेज गेला आहे की जर विना मास्क रस्त्यावर फिराल तर थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे त्यामुळे आता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे जो नियमांचे उल्लंघन करेल त्याच्यावर आता थेट पोलिस कारवाई करतील यामुळे आता या कारवाईमुळे नक्कीच कोरोणाला रोखण्यास मदत होईल अशी चर्चा सर्वसामान्य जनतेमधून उमटू लागली आहे
या कारवाईत भुईज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलीस हवलदार घाडगे, तोरडमल, धायगुडे, मुंगसे , पवार, भोसले, कदम, आवळे, पवार नलवडे, कोळपे ,गायकवाड ,कांबळे, यांनी या कारवाईमध्ये आपला सहभाग नोंदवला