कुडाळ दि.६ .- देशी, विदेशी दारुची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने, स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता, बेकायदा, बिगर परवाना, वहातुक करीत असताना मेढा पोलिस ठाण्याचे सपोनि अमोल माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुडाळच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात दोघांना जेरबंद केले.त्यांच्याकडुन देशी विदेशी दारुच्या बाटल्या सह मोटसायकल व मोबाईल असा एकुण ६२९६०. रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
या प्रकरणी पोलिसांनी मंगेश भरत निकम उर्फ मंगेश रामचंद्र निकम, वय – २९ वर्षे, रा. करंदी तर्फ कुडाळ, ता. जावली, जि. सातारा व बाबु हणमंत बेलकर, वय – २७ वर्षे, मुळ रा. मुडखेड, नांदेड सध्या रा. पाईप लाईन साईट, करंदी तर्फ कुडाळ,ता.जावली,जि सातारा या दोघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.त्यांचेकडुन ५७६०/- रू किंमतीच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण ९६ देशी दारू टेंगो पंच असे लेबल असलेल्या काचेच्या सीलबंद बाटल्या असून एका बाटलीची किंमत रु.60/- प्रत्येकी., ३२००/-रू किंमतीच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण २० Mc Dowells Whiskey असे लेबल असलेल्या काचेच्या सीलबंद बाटल्या असून एका बाटलीची किंमत रु.१६० आहे .2,000/- रु. किं. चा OPPO कंपनी चा मोबाईल हँडसेट,2,000/-रु. किं. चा VIVO कंपनी चा मोबाईल हँडसेट,50,000/- रु. कि.ची एक Baja कंपनी ची काळे रंगाची पल्सर मोटारसायकल नं. MH 11 AY 2914
एकुण – 62,960/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.अधिक तपास पो.हवा. ओव्हाळ करत आहेत.
.
