Thursday, February 19, 2026
HomeTop Newsवीर जवान प्रथमेश पवार यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप :

वीर जवान प्रथमेश पवार यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप :


सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे सुपुत्र वीर जवान प्रथमेश संजय पवार यांना साश्रू नयनानी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. वीर जवान अमर रहे व भारत माता की जय अशा घोषणा नी आसमंत दुमदुमून गेला होता.प्रथमेशच्या आई ,वडील व भावाचा हृदय पिलवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थित्यांची मने हेलावून गेली होती.
वीर जवान प्रथमेश दोनं वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात दाखल झाला होता. दोन वर्षांचे प्रशिक्षण संपवून फेब्रुवारी महिन्यात गावी सुट्टीवर आला होता. सुट्टी संपल्यावर दान महिन्यांपूर्वी त्याचे पोस्टिंग जम्मू मधील सांबा सेक्टर मध्ये झाले होते. प्रथमेश हा हार्दिक हुन्नरी होता. प्रशिक्षण कालावधीत सुद्धा त्याने नेत्र दीपक कामगिरी केली होती. तो दररोज घरी फोन करून एकडील खुशाली विचारत होता. शुक्रवारी रात्री सुद्धा फोन करून आमच्याशी बोलला होता. परंतु त्यानंतर काही वेळातच प्रथमेशाला गोळी लागली असून तो गंभीर आहे असा फोन आला. त्यानंतर पुन्हा एक तासाने त्याला वीर मरण आल्याचे सैन्य दलातून कळविण्यात आले.अशी माहिती जवान प्रथमेशचे वडील संजय पवार यांनी दिली.
दरम्यान प्रथमेशला वीर मरण आल्याचे समजताच बामणोली गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली होती. प्रत्येक गावात वीर जवान अमर रहेचे बॅनर लावण्यात आले होते.शुक्रवारी रात्री पासून दोन दिवस प्रथमेश चे पार्थिव येण्याची वाट ग्रामस्थ पाहत होते.आज सोमवारी सकाळी त्यांचा पार्थिव देह पाचवड येथे दाखल झाला. पाचवड येथून खास सजवलेल्या वाहनातून अंत्य यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी सरताळे, म्हसवे, कुडाळ, शेते, सोमर्डी बामणोली या गावातील ग्रामस्थांनी पुष्प वृष्टी करून या वीर जवाना ला आदरांजली वाहन्यात आली.
प्रथमेश चे पार्थिव त्याच्या डेरेवाडी येथील घरी काही वेळ अंत्य दर्शना साठी ठेवण्यात आले होते.यावेळी त्याच्या कुटुंबंयांनी केलेल्या आक्रोशने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. त्यानंतर अंत्यविधीसाठी उभारलेल्या शामियान्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सभापती सौ जयश्री गिरी, सामाजिक कार्यकर्ते व व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष विलास बाबा जवळ इत्यादी मान्यवरांच्या सह तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी काळे, त्याचबरोबर जिल्हा पोलिस उपाधीक्षक हंकारे, शीतल दानवे खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वीर जवान प्रथमेश यांना बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. आपल्या तालुक्याचा सुपुत्र प्रथमेश यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page