Thursday, February 19, 2026
HomeTop Newsशासनाने ई पासच्या जोखाडातून जनतेला मुक्त करावे ; ...

शासनाने ई पासच्या जोखाडातून जनतेला मुक्त करावे ; आ.शिवेंद्रसिंहराजे.

 

     

जीव धोक्यात घालून लोकांचा आड मार्गाने प्रवास

सूर्यकांत जोशी कुडाळ – महाराष्ट्रात जिल्ह्या बाहेर प्रवास करण्यासाठी ई पासची सक्ती अद्याप आहे.पूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव शहरांमध्ये होता. त्यामुळे त्याचा ग्रामीण भागात संसर्ग होऊनये यासाठी शासनाने त्यावेळी ई पासचे घातलेले निर्बंध योग्य होते. पण आता ग्रामीण भागात कोरोनाचा  स्थानिक संसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे प्रवासावर ईपासचे निर्बंध निरर्थक आहेत. ईपास काढण्यासाठी लोकांना नाहक त्रास होत असून पास न मिळाल्यास बर्याच वेळी लोक जीव धोक्यात घालून आडमार्गाने प्रवास करत आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने खाजगी वाहनातून प्रवासासाठी असणारे ई पासचे निर्बंध त्वरीत हटवावेत अशी मागणी सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

          देशात कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मार्च मध्ये केंद्रसरकारने लाँकडाऊन मध्ये  अनेक निर्बंध आणले होते. यामध्ये प्रामुख्याने प्रवासावर निर्बंध होते. परंतू आता केंद्र व राज्य सरकारने अन् लाँक प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्र सरकारने आता प्रवासावरील निर्बंध हटवण्यासाठी ईपास ची सक्ती रद्द करण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत. त्यानुसार अनेक राज्यात ईपासच्या माध्यमातून असणारे प्रवासावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. परंतू महाराष्ट्र शासनाने हे निर्बंध सुरू ठेवल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सातारचे तरूण तडफदार आमदार शिवेंद्रसिंहराजें भोसले यांना पत्रकारांनी त्यांची ई पास बाबतची भूमिका विचारली असता आमदारांनी आता ई पासचे तातडीने हटवले पाहिजेत असे स्पष्ट केले.

         आ. शिवेंद्रसिंहराजें म्हणाले, आता अन् लाँक सुरू झाल्याने शहरातील अनेक कंपन्या, व्यवसाय नियमित सुरु झाले आहेत. तसेच अनेकांना काही अत्यावश्यक व अपरिहार्य कारणाने प्रवास करावा लागतो.बर्याच वेळी हे ई पास वेळेवर मिळत नाहीत. तसेच अनेकांकडे अँन्ड्राईड मोबाईल नसल्याने त्यांना ईपास काढण्यासाठी ई सुविधा केंद्रावर जावे लागते. त्यामुळे लोकांचा वेळ वाया जातो तसेच आर्थिक बुर्धंड ही बसतो. ई पास सक्ती मुळे मुंबई करांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागले. आर्थिक अडवणूक सुद्धा सहन करावी लागली

त्यामुळे आता हे ईपास चे झेंगाट नकोच अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.आणि ईपास मिळाला नाही तर लोक जीव धोक्यात घालून आड मार्गाने प्रवास करतात.

        आता एसटीने प्रवास केल्यास ईपासची आवश्यकता नाही असे सरकार म्हणते तर दुसरीकडे खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी ईपासचे निर्बंध ठेवते ही शासनाची दुटप्पी भूमिका योग्य नसल्याची टीका आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

          अगदीच खबरदारी म्हणून लोकांनी प्रवासापूर्वी डाँक्टरांकडून फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे. तसेच कोरोनाशी संबंधित लक्षणे वाटल्यास डाँक्टरांकडे त्वरीत जावे या सूचना ठिक आहेत. परंतु ईपास घेऊन प्रवास केला पाहिजे हे निर्बंध आता निरर्थक आहेत. असेही आ.शिवेंद्रसिंहराजें भोसले म्हणाले.

ईपास मुळे लोकांच्या अडचणीत भर. : सौरभ शिंदे

         आता e-pass सेवा बंद केली पाहिजे.कारण  या निर्बंधांना आता ६ महीने झाले आहेत आणि सर्व सामान्य लोकांच्या अडचणी फार वाढत चालल्या आहेत. लोक आता अजून किती  गावी येतील हाच प्रश्न आहे कारण पुण्या मुंबई सह बाहेरून येणारे सगळे तर येऊन माघारी सुद्धा गेलेत.आता जिल्हा बंदी ठेऊन शासन काय मिळवणार आहे असा प्रश्न लोकांना पडला असून बनावट पास चा धंदा सुरू झाल्याचे लोकांकडून समजत आहे.त्यामुळे शासनाने ईपासचे निर्बंध तातडीने हटवले पाहिजे अशी प्रतिक्रिया जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी दिली आहे.

     ई पास म्हणजे विकतच दुखनं.  

  E पास सक्ती हे आता लोकांसाठी   विकतच दुखन झालंय आणि प्रशासनासाठी अंडी देणारी कोंबडी झाली आहे.या दोन महिन्यात पासा शिवाय आला म्हणून गुन्हा दाखल झाला असे उदाहरण दुर्मिळ आहे.पासा साठी लोकांची कारणेही तकलादू असतात उगाच लोक पासासाठी आपल्या जवळच्या नातेवाईकांना खोटे मारतात किंवा आजारी पाडतात.अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव शिंदे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page