सूर्यकांत जोशी कुडाळ – सिप्ला कंपनी व्यवस्थापक, दि ग्रेट जावली महाबळेश्वर प्रतिष्ठानचे हितचिंतक,म्हाते खुर्द गावचे सुपुत्र सचिन दळवी यांनी आपल्या मातृभूमीच्या मदतीसाठी सिप्ला सी.एस.आर. ला केलेल्या विनंतीला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.यामुळे कंपनीने जावलीकरांच्या सेवेसाठी भरीव अशी मदत केली आहे.यापुर्वी पहिल्या लाटेतही सिप्ला फाउंडेशन जावलीकरां च्या मदतीला धावुन आले होते. आज जावळीचे तहसीलदार श्री.राजेंद्र पोळ साहेब यांच्या कडे मास्क, पीपीई कीट, पल्स मीटर,आय आर थर्मामीटर,हँन्ड ग्लोज इत्यादी आवश्यक साहित्य सिप्ला फाउंडेशनचे सातारा प्रतिनिधी प्रविण घाडगे यांनी सुपुर्त केले. या कामासाठी टीम सिप्ला फाउंडेशन उलका धुरी मँडम, सनी म्हात्रे, सुनिल मकरे यांचे विशेष सहकार्य लाभले. सिप्ला फाउंडेशनने जावली करांना दिलेल्या योगदानाबद्दल तहसीलदार यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानले.
