कुडाळ – कोरोना महामारी च्या काळामध्ये संपूर्ण तालुक्यातील विविध घरातील अनेक कर्ते पुरुष मंडळी , घरपण जपणाऱ्या माता भगिनी ,त्याचबरोबर अनेकांचा आधार असणारे ज्येष्ठ नागरिक यांचा बळी गेला.नैसर्गिक आपत्तीमध्ये ही अनेकांना आपल्या प्राण गमवावे लागले . घरातील कर्ता गमावल्याने त्या कुटुंबाच छञच हरपलं गेलं आहे . नैसर्गिक आपत्तीने गाठलेल्या या अशा जवळ जवळ 300 कुटुंबियांना जावली पंचायत समितीच्या सभापती सौ.जयश्री गिरी व माजी सभापती सुहास गिरी या दाम्पत्याच्या माध्यमातून दिवाळीच्या सणामध्ये मायेचा व प्रेमाचा प्रकाश दाखवत दिवाळी निमित्त फराळ भेट देण्यात आला . अनेक माता-भगिनींना , मुलांना आपल्या हाताने दिवाळी खाऊ घातली . भविष्यामध्ये तुमच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची अडचण अथवा गरज असल्यास संपर्क करा मी तुमच्या बरोबर आहे असा मायेचा आधार दिला .
गेल्या वीस पंचवीस वर्षांत सुहास गिरी व सौ.जयश्री गिरी यांनी संपूर्ण तालुक्यातील लोकांना मायेचा आधार दिला आहे.तालुक्यातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांच्या कुटुंबात अंधार असताना आपण दिवाळी साजरी करावी हे सभापती जयश्री ताईंच्या मनाला न पटणारे होते.जो पर्यंत या दुःखा त असणार्या कुटुंबातील लोकांच्या तोंडांत दिवाळीचा फराळ जाणार नाही तो पर्यंत आपण दिवाळी साजरी करणार नाही.अशी खूणगाठ जयश्रीताई यांनी मनाशी बांधली. आणि ऐन सणाच्या चार दिवसांत तालुक्यातील कोरोना बळींच्या घराघरापर्यंत जयश्रीताई यांनी स्वतःच्या हाताने दिवाळी फराळाची भेट दिली.
अनेक राजकीय नेते एखादी घटना घडली की संवेदना व्यक्त करुन पाठ फिरवतात.परंतू गिरी दाम्पत्याच्या माध्यमातून आज पर्यंत स्वनिधीतून अनेक गरजुंना मदतीचा हात देण्यात आला आहे.त्यांनी दुःखा त असलेल्या कुटुंबांना दिलेल्या दिवाळी भेटीने अनेक कुटुंबीय भारावून गेले त्याच बरोबर त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू देखील आले . खरोखरच जावली तालुक्याच्या माऊली म्हणून जयश्रीताई सुहास गिरी यांची ही भेट या कुटुंबासाठी खूप मोलाची ठरत आहे .
