Sunday, April 5, 2026
HomeTop Newsसह्याद्री पतसंस्थेच्या वतीने कोरोना बाधितांसाठी मोफत आँक्सिजन सेवा

सह्याद्री पतसंस्थेच्या वतीने कोरोना बाधितांसाठी मोफत आँक्सिजन सेवा

कुडाळ -मेढा आणि परीसरात कोरोनाचे संकट ठाण मांडुन बसल्याने यावेळी मदतीचा हात म्हणून या संकटकाळी मेढा येथील सह्याद्री सहकारी पतसंस्था करहर यांनी विनामोबदला आॅक्सीजन मशीन ३ दिवसा करीता गरजु व्यक्तींना उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतली आहे, 

सामाजिक बांधिलकी ठेवुन सह्याद्री सहकारी पतसंस्थेने कोरोना विरोधातील लढाईत सहभाग नोंदवला आहे, 

सह्याद्री सहकारी पतसंस्था करहर मेढा या संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, पिग्मीचे खातेदार व जावली तालुक्यातील गरजु लोकांना शरीरातील आॅक्सीजन पातळी कमी झाल्यावर, आॅक्सीजन पातळी वाढवण्यासाठी पतसंस्थेच्या वतीने ही मशीन मोफक देण्यात येणार आहे, 

या आॅक्सीजन मशीनचे पुजन संस्थेचे संस्थापक चेअरमन मा संदिपदादा पवार, संस्थापक संचालक मा भास्कर पवार सर, व्हा चेअरमन मा श्रीकांत पवार, संचालक मा सुर्यकांत पोफळे, मा नितीनशेठ पाटॅ, मा राहुल तरडे यांच्या हस्ते करण्यात आले, 

यावेळी पतसंस्थेच्या मेढा कार्यालय प्रमुख मा धनंजय ज्ञानेश्वर पवार व व्यवस्थापिका मा सौ करिष्मा किरण शिंदे उपस्थित होते, 

गरजु व्यक्तींनी आॅक्सीजन मशीन साठी खालील नंबरवर संपर्क साधा 

धनंजय ज्ञानेश्वर पवार मेढा ७०५७८७३३८७ 

करिष्मा शिंदे मेढा  ९३५६५४०६४२

राहुल तरडे बामणोली ८३८०८७४९७७ 

बाळासाहेब पवार काका, सनपाने ९७६३९७ ३६३७ 

असे आवाहन मेढा कार्यालय प्रमुख धनंजय ज्ञानेश्वर पवार यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page