Monday, July 27, 2026
HomeTop Newsसोमर्डी ग्रामीण रुग्णालयासमोरील गटार स्वच्छतेच्या कामास प्रारंभसंदीप परामणे यांच्या पाठपुराव्याला यश; प्रशासनाची...

सोमर्डी ग्रामीण रुग्णालयासमोरील गटार स्वच्छतेच्या कामास प्रारंभ
संदीप परामणे यांच्या पाठपुराव्याला यश; प्रशासनाची तातडीने कारवाई


कुडाळ (प्रतिनिधी): जावली तालुक्यातील सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील गटारामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसेच डासांची वाढ होऊन विविध साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली होती. या गंभीर समस्येची भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संदीप परामणे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून दखल घेण्याची मागणी केली होती.
या मागणीची गंभीर दखल घेत नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने गटार स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली आहे. ग्रामीण रुग्णालयात तालुकाभरातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या कामाबद्दल ग्रामस्थांनी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अहिरे साहेब, पवार साहेब आणि अटकेकर साहेब यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी रवींद्र परामणे (माजी उपसभापती), संतोष शेलार (माजी सरपंच), रमेश परामणे, सतीश परामणे, मनोज परामणे, भीमराव दरेकर, तात्या कांबळे आणि संतोष परामणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी गटार स्वच्छतेचे काम पूर्ण करून परिसराची नियमित देखभाल करण्याची मागणीही प्रशासनाकडे केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page