Thursday, February 19, 2026
HomeTop Newsसौ. जयश्री गिरी यांना सायगाव गणात मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा- मच्छिंद्र मुळीक

सौ. जयश्री गिरी यांना सायगाव गणात मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा- मच्छिंद्र मुळीक

कुडाळ – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून मतदार संघात प्रत्येक गाव वाडी वस्तीपर्यंत विकास कामे पोचली आहेत. त्याचबरोबर जयश्री गिरी व सुहास गिरी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध जपले आहेत त्यामुळे या निवडणुकीत मतदार भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठाम उभे असून कुडाळ जिल्हा परिषद गटातून जयश्री गिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान घेऊन एक नंबर ने विजय होतील असा विश्वास जावली बाजार समितीचे संचालक मच्छिंद्र मुळीक यांनी व्यक्त केला. 

         माजी सभापती जयश्री गिरी व सुहास गिरी यांनी नुकताच सायगाव गणात प्रत्येक गाव वाडी वस्तीवर जाऊन मतदारांची भेट घेतली. यावेळी मतदारांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले व भरघोस पाठिंबा व्यक्त केला. गिरी दाम्पत्यावरती जनतेचे असणारे प्रेम यावेळी दिसून आले. सत्ता असो वा नसो आपल्या पदाचा त्यांनी कधीही गर्व बाळगला झाला नाही सदैव सर्वसामान्य जनतेत मिळून मिसळून व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन दिलासा देण्याचे काम केले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा गिरी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदार एकजुटीने   भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर मतदान करून सौ जयश्री गिरी तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार सौरभ शिंदे व चारुशीला पवार यांना बहुमताने निवडून आणतील असा विश्वास प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अंकुशराव शिवनकर यांनी सांगितले.

           जयश्री गिरी व सुहास गिरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकताच सायगाव गणातील मतदारांशी प्रत्यक्ष भेट दिली.यावेळी मच्छिंद्र मुळीक,अंकुश शिवणकर, राजेंद्र फरांदे पाटील, अशोक भोसले,जगन्नाथ शिवणकर, सुजित डॉक्टर अतुल भोसले,अचल दास सोनवणे,नामदेव भिसे,दुर्गा भिसे सरपंच अश्विनी मुळीक भीमा शिवणकर राहुल शिवनकर, सोपान भोसले, यांच्यासह विविध गावचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page