Saturday, April 11, 2026
HomeTop Newsसौरभ शिंदे यांना सरताळे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा

सौरभ शिंदे यांना सरताळे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा

कुडाळ –

        भारतीय जनता पक्षाचे   कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ.जयश्री मनिलाल गिरी व कुडाळ पंचायत समिती गणाचे उमेदवार सौरभ शिंदे यांनी नुकताच सरताळे तालुका जावली येथे निवडणूक प्रचारादरम्यान गाव भेट दौरा केला यावेळी सरताळे ग्रामस्थांमधून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा देण्यात आला. यावेळी सरताळे गावातून काढण्यात आलेल्या पदयात्रेत शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.

           राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे गेल्या दहा वर्षात महाराज साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात त्यांनी मागणी केलेल्या विकास कामांची पूर्तता केले आहे आजही कोट्यवधी रुपयांची कामे तालुक्यात सुरू आहेत आपल्या भागातून कोकणाला जोडणारा हायवे होत आहे त्याचबरोबर पाचगणी ते पाचवड हा सुद्धा रस्ता मोठा होत आहे त्यामुळे या विभागातून पर्यटकांचे वर्दळ वाढणार आहे याचा फायदा आपल्या विभागातील व्यवसायांना चालना मिळण्यासाठी नक्कीच होणार आहे महाराज साहेबांच्या माध्यमातून अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे सहकार्याने प्रतापगड सहकारी साखर कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळाले त्याचबरोबर परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळालेला आहे नामदार शिवेंद्र सिंह राजेंचे हात अधिक बळकट करण्यासाठी अनेक वेळा गटाला विरोधकांचे लागलेले ग्रहण सोडवण्यासाठी यावेळी मतदारांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन सौरभ शिंदे यांनी केले. यावेळी माजी सभापती मनीलाल उर्फ सुहास गिरी, जावली बाजार समितीचे संचालक मच्छिंद्र मुळीक,

      

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page