सूर्यकांत जोशी कुडाळ –
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त (दि. 23 नोव्हेंबर) आयोजित करण्यात आलेल्या “सचिन भाऊजी प्रस्तुत होम मिनिस्टर – पैठणीचा” या भव्य कार्यक्रमाला तालुक्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने कार्यक्रम स्थळावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “माता-भगिनींच्या आशीर्वादामुळेच मी आमदार ते मंत्रीपदापर्यंत पोहोचलो आहे. महिलांचे सामर्थ्य समाजाला दिशा देणारे आहे.”
ते पुढे म्हणाले की, प्रतापगड सहकारी साखर कारखाना हा जावलीतील जनतेचा हक्काचा कारखाना असून अजिंक्यतारा कारखान्याने दिलेल्या मदतीमुळे प्रतापगड कारखान्याला नवसंजीवनी मिळाली आहे. येणाऱ्या काळात हा कारखाना स्वबळावर सक्षमपणे उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.माजी आमदार लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्या सामाजिक विचारांच्या वाटेवर सौरभ शिंदे चालत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
माता-भगिनींच्या आशीर्वादानेच यश -सौरभ शिंदे
सामाजिक जीवनात काम करत असताना माता भगिनींच्या आशीर्वाद पाठीशी असणे अतिशय महत्त्वाचे असते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपेक्षेपेक्षाही जास्त महिलांची उपस्थिती हे माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाप्रमाणेच आहे या पुढील काळात नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून शासनाच्या असणाऱ्या विविध योजनांचा लाभ माता भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचबरोबर अन्य विकासात्मक कामांसाठी सुद्धा आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही यावेळी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, भाजप मंडलाध्यक्ष संदीप परामणे, डी.एम.के. जावली सहकारी बँकेचे चेअरमन भिलारे, लालसिंगराव शिंदे पतसंस्थेच्या चेअरमन अंकिता शिंदे, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असणाऱ्या सौ मोनाली बारटक्के तसेच विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या टीव्ही सिरीयल ‘देव माणूस’ मधील नायिका व चित्रपट अभिनेत्री सोनम मसवेकर, त्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या सोहळ्यात ५० पैठणी साड्यांसह फ्रिज, टीव्ही, कुलर, मिक्सर, इस्त्री आदी आकर्षक भेटवस्तू महिलांना प्रदान करण्यात आल्या.
वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला हा उपक्रम महिलांसाठी आनंद व उत्साहाचा अविस्मरणीय सोहळा ठरला.
सौरभबाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :
माता-भगिनींच्या आशीर्वादामुळेच आमदार व मंत्री झालो – नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
LEAVE A REPLY
- Advertisment -
Alright, so I stumbled upon 5699casino the other day. It’s got a decent selection of games. Not the flashiest site ever, but it gets the job done if you’re just looking to unwind and maybe win a few bucks! Give it a shot: 5699casino