Saturday, April 11, 2026
Homeआरोग्यहृदयरोगाचा धोका ओळखणारी ‘लिपोप्रोटीन (ए)’ टेस्ट: प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाची माहिती

हृदयरोगाचा धोका ओळखणारी ‘लिपोप्रोटीन (ए)’ टेस्ट: प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाची माहिती

हृदयरोग  समाजात वेगाने वाढतोय
आज भारतात दर ४ पैकी १ व्यक्तीला हृदयविकाराचा धोका असतो, पण आश्चर्य म्हणजे बहुतेकजण याची तपासणीच करत नाहीत. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलमुळे ही समस्या अधिक गंभीर होते.

लिपोप्रोटीन (ए) ही टेस्ट का महत्त्वाची?
लिपोप्रोटीन (ए) म्हणजेच Lp(a) हे एक विशिष्ट प्रकारचे कोलेस्टेरॉल आहे, जे शरीरात वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज्स निर्माण करू शकते आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या घटना घडू शकतात. लिपोप्रोटीन (ए) टेस्ट केल्याने भविष्यातील हृदयरोगाचा धोका वेळेत ओळखता येतो.

कोणती मंडळी ही टेस्ट नक्की करावी?
– ५५ वर्षांपूर्वी कुटुंबात हृदयरोगाचा इतिहास असलेले व्यक्ती 
– आधी स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक झालेल्या व्यक्ती 
– डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना 
– पोस्ट-मेनोपॉज महिलांना 
– व्हॅस्क्युलर किंवा हृदयाशी संबंधित आरोग्य समस्या असणाऱ्यांनी 

लोकांमध्ये जागरुकता कमी का?
एका सर्व्हेनुसार, फक्त २२% लोकांना ह्या टेस्टबद्दल माहिती आहे आणि केवळ ७% लोकांनी ही टेस्ट केली आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना याची माहिती नसेल तर त्यांना जरूर आयडिया द्या.

लिपोप्रोटीन (ए) तपासणी करता काय फायदा?
– भविष्यातील हृदयरोगाचा आणि स्ट्रोकचा धोका आधीच ओळखता येतो 
– डॉक्टर योग्य वेळी उपाय योजना सुचवू शकतात 
– वेळेवर उपचार झाल्याने प्राण वाचू शकतात 

तुमचं आरोग्य, तुमची जबाबदारी
आजच लिपोप्रोटीन (ए) तपासणीबद्दल आपल्या डॉक्टरांना विचारा आणि आरोग्यदायी आयुष्याचा संकल्प करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page