Saturday, June 13, 2026
HomeTop Newsकोरोनामुक्त गाव करण्याचा जावलीकरांचा निर्धार ; ग्राम दक्षता समित्या सज्ज ; जावलीत...

कोरोनामुक्त गाव करण्याचा जावलीकरांचा निर्धार ; ग्राम दक्षता समित्या सज्ज ; जावलीत आज कोरोनाचा दिलासा

सूर्यकांत जोशी कुडाळ – महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या कोरोना मुक्त गाव अभियानात सक्रीय सहभाग घेऊन शासनाचे पन्नास लाखांचे बक्षीस मिळवण्याचा निर्धार आता जावली तालुक्यातील गावांनी केला आहे.गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी आता ग्रामदक्षता समित्या पुन्हा पुढे सरसावल्या आहेत.कोरोनाच्या दुसर्या लाटेत ग्रामदक्षता समित्या प्रशासनाकडुन काहीशा दुर्लक्षित राहिल्याने यादरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची फारशी साथ मिळाली नाही.परंतु आता ग्रामदक्षता

समित्या अॅक्टिव्ह झाल्याने कोरोनामुक्तीच्या  लढ्याला बळ मिळणार आहे. 

       मंगळवारी १०५ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळल्याने काहीही चिंता वाढली होती.परंतु आज बाधितांना वाढी मध्ये निम्म्याहून अधिक घट झाल्याने दिलासा मिळाला आहे.

             जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ३१/५/२१. रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.१/६/२१  रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ४६ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तर आज ४० जणांनी कोरोनावर मात केली आहे.तालुक्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ६४० आहे.

         आजच्या अहवालात नमूद कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; सावरी २,तेटली १,आंबेघर तर्फे मेढा २,केळघर १, मेढा १७, रिटकवली ३,हुमगांव ३, खर्शीबारामुरे १,म्हसवे २,सनपाने ४, आनेवाडी १,दरे बु.१, करंदी त.कुडाळ २,मोरघर १, प्रभूचीवाडी १, सायगांव ३,सरताळे १,. एकूण ४६.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page