Monday, August 17, 2026
HomeTop Newsकुडाळ येथे पोलिसांकडुन नाकाबंदी ; रस्त्यावर फिरणारांची कसून चौकशी

कुडाळ येथे पोलिसांकडुन नाकाबंदी ; रस्त्यावर फिरणारांची कसून चौकशी

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ येथे पोलिसांकडून दररोज नाकाबंदी करण्यात येत आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणारांवर दंडात्मक कारवाई तसेच अॅन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे.प्रत्येक वाहनांची तपासणी कसून चौकशी केली जात आहे.

          कुडाळ बाजारपेठेत  दुध,पाणी, शेतीच्या कामासाठी बाहेर पडावे लागत आहे.या शिवाय दवाखाने, मेडिकल, एटीएम अशा अत्यावश्यक सेवांसाठी सुद्धा येणा-या लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.यातून विनाकारण रस्त्यावर फिरणारांचा शोध घेण्याचे आव्हान असते.जावली तालुक्यात मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल माने, कुडाळ दूरक्षेत्राचे पीएसआय महेश कदम यांनी या आठवड्यात कारवाईचा बडगा उगारल्याने विनाकारण रस्त्यावर फिरणारांची संख्या कमी झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page