Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा सतिश मर्ढेकर यांची बिनविरोध निवड

जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा सतिश मर्ढेकर यांची बिनविरोध निवड


सुरेश पार्टे – मेढा
जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सुरेखा सतिश मर्ढेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी बी. एस्. साळवी यांच्या अध्यक्षतेखाली , विस्तार अधिकारी श्री पवेकर, श्री. एन् .बी. निकम , ग्रामसेवक वैभव निकम यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थीत सदरची निवडणूक प्रकिया पार पडली. लोकनिमुक्त विद्यमान सरपंच सौ. वर्षाताई विलास जवळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकच अर्ज दाखल झाल्याने हि निवडणूक बिनविरोध होवून सरपंच पदी सौ. सुरेखा मर्ढेकर यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री . साळवी यांनी जाहीर केले.
नवनिर्वाचित सरपंच सौ . सुरेखा मर्ढेकर यांचा मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पांडूरंग( बापू) जवळ , उपनगराध्यक्षा सौ. कल्पना जवळ , मा. सरपंच वर्षाताई जवळ , सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भैरवनाथ मंडळाचे अध्यक्ष सदाशिव जवळ , माजी सरपंच गणपत जवळ , माजी अध्यक्ष आण्णासाहेब धनावडे , सुरेशबुवा जवळ,
वे०णामाई चेअरमन सुरेश पार्टे, वे०णा निरंजन पतसंस्थेचे चेअरमन शंकरराव मर्ढेकर , आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन सतिश मर्ढेकर , धरणग्रस्तांचे नेते राजेंद्र जाधव , बिभवीच्या सरपंच सौ . जयश्री जाधव ,अंगणवाडी पतसंस्थेच्या चेअरमन सौ . सुनिता पार्टे ,,ग्रामपंचायत उपसरपंच शंकर जवळ सदस्य राजेंद्र जावळे , राजू निकम , गीता लोखंडे , कल्पना जवळ, शांताबाई जवळ , संतोष वारागडे, विशाल रेळेकर , शंकर जवळ, संजय दळवी , संदिप गाडवे, अविनाश कारंजकर , सुनिल जवळ , सुनिल शेडगे , विठ्ठल जवळ , श्रीरंग जवळ , बजरंग जावळे नवनाथ मोरे , यांच्यासह ग्रामस्थ मंडळ व भैरवनाथ तरूण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते .
चौकट
गावाची एकी व परंपरा कायम राखून सर्वांना बरोबर घेवून लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गांवाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करीन असे आश्वासन नवनिर्वाचित सरपंच सौ . सुरेखा मर्ढेकर यांनी या प्रसंगी दिले.
x पदाचा स्विकार करताच मर्ढेकर परिवारांचे वतीने या प्रसंगी मंदिर परिसर व गांवाची संपूर्ण पेठ दृष्टीक्षेपात येण्यासाठी सिसीटीव्ही यंत्रणेचा लोकापर्ण सोहळा यावेळी सरपंच व मान्यवरांचे उपस्थितीत पार पडला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page