*जावळीचा मावळा संदीप शिर्के यांनी अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनमध्ये पटकविला आठवा क्रमांक * म्हसवे ता.जावली या ठिकाणीचे सुपुत्र श्री. संदीप शिर्के यांनी नुकत्याच वेस्टन घाट रनिंग फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या आशिया खंडातील दुर्गम व आव्हानात्मक समजल्या जाणा-या अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉन स्पर्धेत ८ वा क्रमांक पटकविला.सिंहगड,रायगड व तोरणा (एसआरटी) या गड-किल्ल्यांना साद घालणारी ही स्पर्धा ५३ किलोमीटरची होती. ५१२ स्पर्धकांमध्ये पहिल्याच प्रयत्नात संदीप यांची ही कामगिरी यशस्वी झाली. एस आर टी म्हणजे सिंहगड रायगड आणि तोरणा हे अंतर पूर्ण करायला सरासरी बारा तासाचा वेळ लागतो परंतु श्री.संदीप शिर्के यांनी हे अंतर अवघ्या आठ तासात पूर्ण केलं. या स्पर्धेतील गुणांकन आंतरराष्ट्रीय पाच स्पर्धांसाठी भविष्यात उपयोगाचे देखील ठरते.देश विदेशातून सहभागी होण्याकरता आलेल्या अनेक व्यावसायिक आणि हौशी धावपटूमधून संदीप शिर्के यांनी मिळवलेलं यश निश्चितच स्फुर्ती,प्रेरणा, कौतुक तसेच शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या समस्त जावलीकरांसाठी अभिमान आणि स्वाभिमान जागवणार आहे.व्यावसायिक दृष्ट्या कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती चिकाटी आणि ध्येयासक्ती या जोरावर तसेच आठवड्याचे सहा दिवस नियमित व्यायाम आसन योग स्ट्रेचिंग ध्यान धारणा जिम यासह रोज स्वतःमधील शारीरिक क्षमता वाढवत नेली. जावली तालुक्यातील म्हसवे गावचे श्री संदीप शिर्के हे शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या राज्यस्तरीय नामांकित पतसंस्थेमध्ये शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.संदीप शिर्के हे वास्तव्यास जरी ऐरोली नवी मुंबई येथे असले तरी त्यांच्या यशाने फक्त शिवकृपा पतसंस्था परिवारच नव्हे तर समस्त जावलीकर ,म्हसवे ग्रामस्थांचीही मानही अभिमानानं उंचावली आहे. वडाचे म्हसवे म्हणून ऐतिहासिक प्रसिद्धी असणार्या या गावाच्या शिरपेचात मॅरेथॉन पट्टू संदिप शिर्के याच्या यशाने मानाचा तुरा रोवला गेला आहे .
संदीप शिर्के यांचे अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉन स्पर्धेत यश
0
19
RELATED ARTICLES
- Advertisment -
