Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत कोरोना संसर्ग आटोक्यात ;३९ डिस्चार्ज, १३ बाधितांची भर

जावलीत कोरोना संसर्ग आटोक्यात ;३९ डिस्चार्ज, १३ बाधितांची भर

 

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असून आज ३९ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवार दि. ५ रोजी  बहुले १, सर्जापूर १, रुईघर ४ असे एकूण ६ तर सोमवार   दि. ७ रोजी जवळवाडी ५, सावली १, तेटली  १ असे ७ जण कोरोना बाधित आहेत.असे एकूण १३ जण नव्याने कोरोना बाधित झाले आहेत. अशी माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

       तालुक्यात आज अखेर एकूण कोरोना बाधित २४५१, डिस्चार्ज २३६८, मृत्यू ६४ झाले असून तालुक्यात १९ जण कोरोनाचे अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page