सूर्यकांत जोशी कुडाळ – सोनगाव ता. जावली हद्दीत डांगमाळ नावाच्या शिवारात काळुबाई मंदिराच्या जवळच्या बाभळीच्या झाडाखाली मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मेढा पोलिसांनी छापा टाकून ५०९० रुपये रोख व ५३५०० रुपयांचे मोबाईल,व जुगाराचे साहित्य जप्त केले.याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर तीनपानी जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच मास्क न लावल्याने जिल्हाधिकारी सातारा यांच्या साथ रोग नियंत्रण आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे पीएसआय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय ओव्हाळ अधिक तपास करत आहेत.