. आज सकाळी आलेल्या अहवाला नुसार २४ जण कोरोना बाधित;
एकूण – ९५८ , बळी २४, डिस्चार्ज ६२६ ,अँक्टिव्ह ३०९
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ येथील ७६ वर्षीय पुरुषाचा रविवारी तर रानगेघर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा आज सोमवारी कोरोना मुळे मृत्यू झाला असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.कोरोना बळींचा आकडा २४ वर गेला आहे. तर गेल्या सात दिवसात कोरोना बाधितांचा आकडा १७५ वर गेला असुन कोरोना मुळे आठवड्यात तीन जणांचा बळी गेला आहे.
दरम्यान या दोन्ही कोरोना बळींबाबत मिळालेली माहिती अशी,कुडाळ येथील व्यक्तीला तब्येत बिघडल्याने शनिवारी सकाळी क्रांतीसिंह नानापाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याच दिवशी रात्री त्यांचा मृत्यू झाला. परंतु कोरोना अहवाल रविवारी दुपारी अहवाल पाँझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागाने मृत देहावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान या व्यक्तीला पूर्वीच्या आजाराची पार्श्वभूमी होती.
रानगेघर येथील व्यक्तीला शनिवारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचाही मृत्यू पश्चात अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागाने मृत देहावर अंत्यसंस्कार केले.
आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवाला नुसार जावली तालुक्यात २४ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे .अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
यामध्ये उंबरवाडी १४,मेढा ६,
नांदगणे१,सोनगाव २,दापवडी १ अशा चोवीस जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे.
नियम न पाळणारांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई ;
कोरोनाचा सर्वत्र हाहाःकार होत असताना मास्क न वापरणाऱ्या तसेच सोशल डिस्टेन्सींग न पाळणारांवर आज मेढा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. आज मेढा व कुडाळ येथील नियम न पाळणार्या वीस लोकांवर दंडात्मक कारवाई करुन दहाहजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी दिली.
मंगळवार पासून जनता कर्फ्यूचे आवाहन
दरम्यान तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते ,व्यापारी यांच्या वतीने उद्या मंगळवार पासून आठ दिवस कडकडीत बंद व जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. या आठ दिवसांत लोकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घरातून बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोना तालुक्यातून हद्दपार होईल.कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत असताना काही लोक जाणीव पूर्वक नियम पाळत नाहीत.त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा अधिक धोका आहे.
शासनाचे नियम न पाळणारांवर कडक कारवाई – तहसीलदार
सार्वजनिक ठिकाणी मास्क नसणाऱ्या तसेच सोशल डिस्टेन्सींग न पाळणार्या व्यक्ती व आस्थापनांवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार शरद पाटील यांनी दिला आहे.
जावली तालुक्यातील नांदगणे गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील नांदगणे या दोन गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार नांदगणे गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
