Thursday, February 19, 2026
HomeTop Newsसर्वसामान्य जनतेच्या आग्रही मागणीमुळेच आपली शिवसेनेतून उमेदवारी त्यामुळे आपला विजय निश्चित -...

सर्वसामान्य जनतेच्या आग्रही मागणीमुळेच आपली शिवसेनेतून उमेदवारी त्यामुळे आपला विजय निश्चित – प्रशांत तरडे


  कुडाळ – सत्ताधारी राजकीय पक्षाकडून गेल्या काही वर्षात घराणेशाही आणि पैसा बघून सर्वसामान्य जनतेवर उमेदवारी लादली जाते जनतेला त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहणारा त्यांच्यातीलच एक सामान्य नेता हवा असतो. या निवडणुकीत सुद्धा आपण केवळ लोक आग्रहास्तव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मशाल या चिन्हावर पंचायत समिती कुडाळ गणातून निवडणूक लढवत आहे.
           तब्बल नऊ वर्षानंतर होणारी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार असून सर्वसामान्य जनता नक्कीच आपल्या पाठीशी राहील. गेल्या आठ दहा वर्षात जरी सत्ता नसली तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात आपण कायम सोबत राहिलो आहे याची जाण नक्कीच जनतेला आहे. यापूर्वी सुद्धा शिवसेनेतून आपण उमेदवार म्हणून सत्ताधाऱ्या विरोधात जोरदार लढत दिली आहे आणि यावेळी  सर्वसामान्य जनता आपल्याला विजय मिळवून देईल असा विश्वास प्रशांत तरडे यांनी व्यक्त केला.
          कुडाळ गणात बामणोली  हे गाव मोठ्या मतदार संख्येचे आहे तरीसुद्धा या गावाला उमेदवारी देण्याबाबत सातत्याने डावलले जाते.याची सल बामणोली ग्रामस्थांच्या मनात मध्ये आहे. निवडणुकीत मध्ये यश मिळवण्याची ताकद असणारे गावात अनेक ताकतवान कार्यकर्ते असून  त्यांना आजपर्यंत उमेदवारी डावलली गेली . कुडाळ गणात शिवसेनेवर नितांत प्रेम करणारे आजही शेकडो कार्यकर्ते आहेत.काही जण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली दबले आहेत. त्यामुळे उघड पाठिंबा देण्यास पुढे येत नाहीत परंतु त्यांचे आपल्यालाच या निवडणुकीत सहकार्य मिळणार आहे.अन्य उमेदवारांच्या बाबतीत मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा फायदा नक्कीच आपल्याला होईल.
          राज्यात ज्यावेळी शिवसेना भाजपा युतीचे सरकार होते त्यावेळी सुमारे 30 वर्षांपूर्वी जावली तालुक्यासाठी क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले होते परंतु अद्यापही क्रीडा संकुल होऊ शकले नाही परिणामी क्षमता असून सुद्धा जावली तालुक्यातील क्रीडापटुना क्रीडांगण आणि योग्य प्रशिक्षण मिळू शकत नाही त्यामुळे आपण  तालुक्यात क्रीडा संकुल लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर अनेक शासकीय कामासाठी या विभागातील जनतेला मेढ्याला जावे लागते. विशेषता खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी दुय्यम निबंधकांचे कार्यालय कुडाळ व करहर विभागातील जनतेला सोयीचे व्हावे अशा ठिकाणी असणे गरजेचे आहे  यासाठी हे प्रयत्न करणार आहे जावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात जे अवैध व्यवसाय चालू आहेत ते कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे हे सुद्धा जनतेला चांगलेच ठेवत आहे या पुढील काळात या अवध व्यवसायांना आळा घालण्याचे काम शिवसेना केले जाईल असा इशारा  प्रशांत तरडे यांनी दिला. सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून मतदारांनी या निवडणुकीत मशाल या चिन्हावर शिक्का मारून तुमच्या आमच्या मनातील असणारा उमेदवार म्हणून आपणास आपले बहुमोल माध्यमातून विजयी करावे असे आवाहन प्रशांत तरडे यांनी केले आहे 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page