
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. जयश्री गिरी, कुडाळ पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सौरभबाबा शिंदे तसेच सायगाव पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार चारुशीला पवार यांचा सामूहिक प्रचार प्रारंभ केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच कुडाळ गटातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी या ऐतिहासिक प्रचार शुभारंभाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे कळकळीचे आवाहन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कुडाळ गणाचे भाजपचे अधिकृत उमेदवार सौरभ शिंदे यांनी केले आहे.
हा कार्यक्रम
स्थळ : नटराज गणेश मंदिर, बाजारपेठ, कुडाळ
दिनांक : बुधवार, २८
वेळ : सकाळी ९.३० वाजता
भाजपच्या संघटित ताकदीचे दर्शन घडवणारा व आगामी निवडणुकीसाठी दिशादर्शक ठरणारा हा प्रचार शुभारंभ सोहळा कुडाळ गटाच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.