Homeसामाजिककुडाळ मध्ये गणरायांचे अभूतपूर्व उत्साहात स्वागत

कुडाळ मध्ये गणरायांचे अभूतपूर्व उत्साहात स्वागत

सूर्यकांत जोशी कुडाळ -गेले तीन वर्षे कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. परंतु यावर्षी भयमुक्त वातावरणात अभूतपूर्व उत्साहात घरगुती गणपती बाप्पा बरोबरच सार्वजनिक मंडळानी सुद्धा अभूतपूर्व उत्साहात गणरायांचे स्वागत केले.

सकाळी घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली. दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणरायांच्या मिरवाणुकीच्या तयारीत असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या मिरवणूका निघण्यास उशीर झाला. पावसाचा जोर कमी होताच तरुणाईचा भक्तीरासाचा जोश वाढला आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात गणरायांच्या आगमन मिरवणूकीला प्रारंभ झाला. वाई व सातारा येथील ढोल ताशांची पथकांना या मिरवणुकीसाठी पाचरण करण्यात आले होते.ढोल ताशांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने कुडाळ परिसर दुमदुमून गेला होता. अनेक मंडळानी यावर्षी भव्य गणेशमूर्ती आणल्या आहेत.रात्री उशीरा मिरवणूकीने आणून मंडळानी सजवलेल्या खास मंडपात गणरायाची प्रतिष्ठापणा केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular