
कुडाळ- भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद कुडाळ गटाच्या अधिकृत उमेदवार सौ जयश्री सुहास गिरी व कुडाळ पंचायत समिती गणाचे उमेदवार सौरभ राजेंद्र शिंदे यांच्या प्रचारार्थ कुडाळ तालुका जावली येथे बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेसाठी सर्व मतदार बंधू-भगिनींना बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी गेल्या पंधरा दिवसात संपूर्ण कुडाळ गटातील प्रत्येक गाव वाडीवस्त्यावर प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे या उमेदवारांना मतदारांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे कुडाळ गटातील पक्षाचे सर्व उमेदवार विक्रमी मताधिकाने निवडून येतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत असताना दिसत आहे.
