Saturday, June 13, 2026
HomeTop Newsभाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय हीच मतदारांची खरी पोहोच पावती- मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय हीच मतदारांची खरी पोहोच पावती- मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


(अजित जगताप )
म्हसवे दि: जावळी तालुक्यामध्ये प्रत्येक गाव वाड्या वस्तीमध्ये विकास कामे केली आहेत .त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मताधिक्यामध्ये वाढ होत आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलवून मतदारांनी विकास कामाची पोहोच पावती द्यावी. असे नम्र आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हसवे तालुका जावळी येथे झालेल्या कोपरा सभेमध्ये केले.
     म्हसवे गट व दोन्ही गणातील  भाजपच्या उमेदवारांच्या प्रचार निमित्त तसेच वार्षिक यात्रा आणि मतदारांना संबोधित करण्यासाठी मंत्री महोदय आले होते. त्यांनी श्री चे दर्शन घेऊन यात्रेनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच गावातच नव्हे तर संपूर्ण जावली तालुक्यात केलेल्या विकास कामाबाबत सर्व मतदार व ग्रामस्थ जागृत आहेत. विकास कामे आणि संपर्क ठेवल्यामुळेच विकास कामे व संपर्क ठेवल्यामुळे ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. भविष्यात विकासाची गंगोत्री अधिक वाहती ठेवण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


              म्हसवे येथील मान्यवर ग्रामस्थांच्या समवेत म्हसवे गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री.वसंतराव मानकुमरे (भाऊ), म्हसवे पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. रेश्मा समाधान पोफळे यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा घेण्यात आली.
    जावळी तालुक्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी सभापतीअरुणा शिर्के, तानाजी शिर्के, भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामणे, माजी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, हिंदुराव तरडे, समाधान पोफळे, अजित इंदलकर, प्रमोद शिंदे व श्रीमती वैशाली दिपक कांबळे,शुभम कांबळे, कुमारी अंकिता जगताप व  सौ.प्रियांका कांबळे उरणकर व
मान्यवर ग्रामस्थ तसेच म्हसवे जिल्हापरिषद गटातील सर्व कार्यकर्ते, परिसरातील विविध गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कमळ” या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. याचा मंत्री महोदयांनी प्रचारानिमित्त पुनरुच्चार केला. म्हसवे जिल्हा परिषद गट इतर मागासवर्गीय आरक्षित असल्यामुळे या गटातील अनेकांनी कुणबी मराठा दाखला काढून या जागेवर दावा केला आहे. एवढेच नव्हे तर श्री मानकुमरे यांना उमेदवारी दिली आहे. सर्व समाजासाठी झटणारे नेते म्हणून श्री मानकुमरे यांच्या विजयासाठी सामुदायिकरित्या प्रयत्न केला जात आहे. भविष्यात सातारा जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करताना विकास कामांमध्येही सन्माननीय मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा संकल्प अनेकांनी केला आहे. जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीची सक्षम व योग्य व्यक्तीची निवड करण्याचा प्रयत्न मतदार करतील. अशी आशा व्यक्त केली जात आहे. या कोपरासभेला मोठ्या संख्येने मतदार व ग्रामस्थ उपस्थित राहिल्याबद्दल भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आभार मानले.


____________________

फोटो- भाजप उमेदवार श्री.
मानकुमरे व सौ पोफळे यांच्या प्रचार निमित्त बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (छाया– अजित जगताप, सायगाव)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page