Saturday, June 13, 2026
HomeTop Newsकोरोना मुळे निराधार होणा-यांना केजरीवाल सरकार देणार पेन्शनचा आधार.

कोरोना मुळे निराधार होणा-यांना केजरीवाल सरकार देणार पेन्शनचा आधार.

केजरीवाल सरकारचा महत्वपूर्ण निर्णय ; कोरोना मुळे निराधार होणा-याना केजरीवाल सरकार देणार पेन्शनचा आधार.

सूर्यकांत जोशी कुडाळ :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने आदर्शवत निर्णय घेतला आहे.कोरोनामुळे निराधार होणा-यांना मासिक अडिच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

          याबाबत एका वृत्तवाहिनीने केलेल्या प्रसिद्ध केलेल्या वृत्ता नुसार कोरोना मुळे आईवडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत , कमावत्या पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला, कमावत्या पत्नीचा मृत्यू झाल्यास पत्नीला, कमावत्या मुलांचा मृत्यू झाला तर आई-वडील यांना मासिक कठिण हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.

           महाराष्ट्रात दररोज होणा-या राजकीय आरोप प्रत्यारोपांना सर्वसामान्य जनता अक्षरशः कंटाळली आहे.जनतेला शासनाकडून अशा प्रकारच्या आधाराची आवश्यकता आहे.पण गेल्या काही महिन्यांत कोणताही विषय असो प्रत्येक वेळी ही जबाबदारी केंद्राची की राज्याची असाच रंग दिला जातो.आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडतात आणि यात प्रत्यक्ष कार्यवाही बाजूला रहाते.अशा प्रकारे लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.दिल्ली सरकार वीज मोफत देऊ शकते.पण महाराष्ट्रात व्याजासकट वीज बील वसुली केली जात आहे.केवळ जनतेला गहू व तांदूळ मोफत दिले म्हणजे आपण फार मोठे दाणशूर असल्याचा आव आणला जातो.सर्वसामान्य जनतेला आधार देणारा निर्णय घेणारे केजरीवाल सरकार खरोखरच कौतुकास पात्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page