जावलीतील कोरोना विकेंडला गेला की झाला चक्रीवादळात गायब .
गेल्या दोन महिन्यांतील बाधितांच्या संख्येतील निचांक .
एकूण ; बाधित.६८९४ , डिस्चार्ज. ६००६, मृत्यू. १७९, अॅक्टिव्ह ७०९.
सूर्यकांत जोशी कुडाळ – एखादी नकोशी असणारी गोष्ट जर अचानक गायब झाली तर केवढं आश्चर्य आणि आनंदमय वाटते.तसच आज जावली तालुक्यातील कोरोना अचानक गायब झाल्याचे आश्चर्य जावली करांना ही सुखद धक्का देणारेच आहे.दररोज शंभर ते दिशेच्या पटीत वाढवणारा कोरोना बाधितांचा आकडा वीस पर्यंत अचानक खाली आला.त्यामुळे कोरोना विकेंडला गेला की तौत्के चक्रीवादळात उडून गेल्याचा आनंद साजरा करावा.असाच काहीसा आजचा अहवाल आहे.खरंतर गेल्या पंधरा महिन्यांपासून सगळेच जण कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करत आहोत.या कोरोना रुपी राक्षसाचा लवकर नायनाट होऊन जनजीवन पूर्वपदावर येण्याची नक्कीच प्रतिक्षा आहे.त्यासाठीच आज कोरोना बाधितांचा कमी असला तरीही जावलीकरांनो गाफील राहू नका.सावध रहा.कोरोना नावाचा शत्रू अद्रुष्य स्वरूपात दबा धरून बसला असेल.काळजी घ्या, स्वतः ची, आपल्या परिवाराची आणि आपल्या असंख्य ज्ञाती बांधव,आणि हितचिंतकांची.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.१५ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.१६ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये २१ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. आज ९७ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे.बामणोली क.१,मेढा १,डांगरेघर १,केडंबे १, कुडाळ ८,शेते १,कुसुंबी १,रेंगडी ४, सायगांव २,सरताळे १ एकूण २१.