Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीत आजही कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार ;

जावलीत आजही कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार ;

जावलीकरांनो नियम पाळा, घरात सुरक्षित रहा.

जावलीत आजही कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार ; 

एकूण बाधित ५४५१, डिस्चार्ज ४३०० , मृत्यू १२९ , अॅक्टिव्ह.१०२२ ,

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आजही कोरोना बाधितांना आकड्यांचे शंभरी पार केली आहे.एकूणच सातारा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.बेड मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे.अशा परिस्थितीत दररोज नवनवीन गावांना कोरोनाचा विळखा पडत आहे.गेल्या दोन महिन्यांत कोरोनामुळे मृत्यू चे प्रमाण वाढत आहे.कोरोना बाधितांचा वाढता आकडा जावलीकरांना नियम पाळा,घरातच सुरक्षित रहा असाच संदेश देत आहे.

         जावली तालुक्यात दि. २९ रोजी एघेतलेल्या स्वाब मध्ये तसेच दि.३० रोजी च्या अॅंटीजेन टेस्ट मध्ये ११३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. ५२ जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. आज एप्रिल महिन्यातील आणखी पाच मृत्यू ची नोंद झाली आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

          दि. २९ व ३० रोजी आसणी ११,भूतेघर २,बिभवी २,बोंडारवाडी २,गवंडी ५, जवळवाडी १,केडंबे १,केळघर १९,मामुर्डी २,मेढा २  पैकी एक मृत्यू दि.१९/४/२१,ओझरे १,रिटकवली ३,वाळंजवाडी १, आखाडे २,आंबेघर त.मेढा ७,हातगेघर १ मृत्यू दि.२८/४/२१, कुडाळ १,पानस २,दिवदिव ३,दुंद १,म्हाते बु.२,मोहाट १,पाटणेमाची २,पिंपरी तर्फे मेढा १,सायळी ३,आनेवाडी १, भिवडी १७, दरे बु.८,खर्शी त.कुडाळ १,महिगांव १,पवारवाडी १,प्रभूचीवाडी १,सायगांव २ पैकी १  मृत्यू २६/४/२१,सर्जापूर १, सरताळे १ एकूण ११३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page