Saturday, June 13, 2026
HomeTop Newsकुडाळ मध्ये दि.३ ते १० मे जनता कर्फ्यु* ,कुडाळ ची यात्रा होणार...

कुडाळ मध्ये दि.३ ते १० मे जनता कर्फ्यु* ,कुडाळ ची यात्रा होणार नाही.

*

सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ परिसरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुडाळ आपत्ती व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कुडाळ… व कुडाळ ग्रामस्थ यांनी दि.३ ते १० मे  दरम्यान कुडाळ येथे जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णया नुसार  कुडाळ येथील सर्व ग्रामस्थ, नागरिक,  व्यापारी वर्ग व भाजीपाला विक्रेते यांनी या सूचनांचे पालन करुन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 *फक्त अत्यावश्यक सेवा (मेडीकल आणि दवाखाने)* सुरू राहतील या व्यतिरिक्त सर्व दुकाने व भाजीपाला बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

       तसेच  दि. ५ मे आणि दि. ६ मे रोजी होणारी, ग्रामदैवत श्री पिंपळेश्वर- श्री वाकडेश्वर महाराजांची *यात्रा रद्द* करण्यात आली आहे.  *कोणीही मंदिराकडे जाऊ नये..*असेही आवाहन ग्रामपंचायत कुडाळ व आपत्ती व्यवस्थापन समितीने केले आहे.

सर्व सुचनांचे पालन करुया.. 

काळजी घ्या …सुरक्षित रहा..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page