Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावलीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा दिलासा ; नोंदीचा घोळ अजुनही कायम

जावलीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा दिलासा ; नोंदीचा घोळ अजुनही कायम

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने दिलासा दिला आहे.असे असले तरीही कोरोना बाधित तसेच कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नोंदी प्रशासनाकडे वेळेवर येत नसल्याचे दिसून येत आहे.

         जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २. रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि. ३ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ४२ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ५२ जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत.तालुक्यात सध्या ६३० अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.. 

           आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे : केळघर १, मेढा १४,घोटेघर २, कुडाळ ३, म्हसवे १,सनपाने १,शेते २,कुसुंबी १, पिंपरी तर्फे मेढा २, वागदरे ४,आलेवाडी १,आनेवाडी ४,खर्शी त.कुडाळ ४, सर्जापूर १, सायगांव १. एकूण ४२.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page