Tuesday, April 7, 2026
HomeTop Newsजावली तालुका कोरोनातून सावरतोय ; संस्थात्मक विलगीकरणाचे दृश्य परिणाम

जावली तालुका कोरोनातून सावरतोय ; संस्थात्मक विलगीकरणाचे दृश्य परिणाम

जावलीचा कोरोना रिकव्हरी दर ९२.७१ ; अॅक्टिव्ह रुग्ण दर ४.७७ ;

सूर्यकांत जोशी कुडाळ ;दि.९ – गृहविलगीकरण बंद करुन संस्थात्मक विलगीकरण सुरू केल्या नंतर पंधरा दिवसांतच कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.जावली तालुक्यात सुद्धा प्रशासनाने ठोस उपाययोजना करून ग्रामविलगीकरणावर भर दिल्याने तालुका कोरोनातून सावरत आहे.तालुक्याचा रिकव्हरी दर ९२.७१ टक्के पर्यंत वाढला असून अॅक्टिव्ह रुग्ण दर ४.७७ टक्क्यांपर्यंत आला आहे. तालुक्यात अजुनही  ३९३ अॅक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत.

           जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.७ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.८ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये १८ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तसेच केंजळ येथील दि.१०/५ रोजी झालेल्या एका मृत्यू सह हे व जून महिन्यातील अन्य तीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तालुक्यातील कोरोना मृत्यूचा आकडा २०७ झाला आहे.

         आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; केळघर २,मरडमुरे १,हातगेघर १,रांजणी १, पिंपरी तर्फे मेढा १,वागदरे १,दरे बु.१, इंदवली १,नेवेकरवाडी ३, प्रभूचीवाडी १,सायगांव ५.एकूण १८

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page