Saturday, June 13, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज कोरोना मुक्तीचा दिलासा ; बाधितांची संख्या नियंत्रणात

जावली तालुक्यात आज कोरोना मुक्तीचा दिलासा ; बाधितांची संख्या नियंत्रणात

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कोरोना मुक्तीचा आकडा शंभरी पार गेल्या मुळे दिलासा मिळाला आहे.त्यातुलनेत कोरोना बाधितांना आकडा नियंत्रणात आहे.परंतू थोडासा निष्काळजीपणा कोरोनाला निमंत्रण देणारा आहे.

              जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात आज तब्बल १०५ जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत.तालुक्यात अजून ३११ कोरोना बाधित अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.तालुक्यात दि. ८ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि. ९.  रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये २३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. यामध्ये रांजणी २,म्हसवे ३, कुडाळ ६, सोनगाव १,आनेवाडी २, इंदवली १,दरे बु.१,नेवेकरवाडी ४, प्रभूचीवाडी २,सायगांव १.एकूण २३.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page