सूर्यकांत जोशी कुडाळ – प्रशासनाच्या प्रयत्नांना जावलीतील जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने तालुक्यात कोरोना बाधितांची वाढ नियंत्रणात आली आहे.कोरोना निर्बंध शिथिल होत असताना लोकांनी अत्यंत जबाबदारीने नियम पाळून कोरोना पासून स्वसंरक्षण करण्याची दक्षता घेतली पाहिजे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.१० रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये २५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे तर ४५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.आज एप्रिल व मे महिन्यातील तीन मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा २१० झाला आहे.तालुक्यात २९० अॅक्टिव्ह कोरोना बाधित आहेत.तालुक्याचा रिकव्हरी दर ९३.९६ टक्के झाला असून अॅक्टिव्ह रुग्ण दर ३.५० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे केळघर १,मेढा २, बामणोली तर्फे कुडाळ २,हुमगांव १, कुडाळ १,रांजणी २,कुसुंबी १,आनेवाडी ३,बेलावडे २,दरे बु.६,खर्शी तर्फे कुडाळ १,मार्ली १,नेवेकरवाडी १,सायगांव १ एकूण २७.