Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यातील तीन गट आणि सहा गणात बहुरंगी लढती : जिल्हा परिषद...

जावली तालुक्यातील तीन गट आणि सहा गणात बहुरंगी लढती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रंगतदार अवस्थेत :

 

 सूर्यकांत जोशी कुडाळ-

         सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जावली तालुक्यातून म्हसवे,कुडाळ व कुसुंबी या तीन गटात प्रत्येकी तीन प्रमाणे एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. तसेच जावली पंचायत समितीच्या सहा गणात कुडाळ गणात चार उमेदवार असून खर्शी बारामुरे गणात तीन, म्हसवे गणात तीन,सायगाव आणि आंबेघर तर्फ मेढा गणात प्रत्येकी दोन असे सहा जागांसाठी 14 उमेदवार  निवडणूक रिंगणात उभे आहेत.   भारतीय जनता पक्ष, शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रमुख चार पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत याशिवाय काही अपक्षांनी आपली उमेदवारी अर्ज ठेवले आहेत.

           आज अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत होती त्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहेत ज्यांना ही निवडणूक लढवण्याचे आहे असे उमेदवार कालपासूनच नॉट रिचेबल होते आणि त्यांनी आपले व आपले कुटुंबीयांचे मोबाईल फोन स्विच ऑफ करून ठेवले होते. तब्बल नऊ वर्षानंतर होणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आता रंगतदार अवस्थेत आली आहे.

       जिल्हा परिषदेच्या कुडाळ गटात जयश्री मणिलाल गिरी (भाजप), पुनम प्रशांत नायकुडे (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष) जयश्री संजय शेवते (अपक्ष) असे तीन उमेदवार आहेत. कुडाळ गणातून प्रशांत मारुती तरडे (शिवसेना उद्धव ठाकरे) राजेंद्र रामचंद्र शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष) सौरभ राजेंद्र शिंदे (भाजपा) राजेंद्र खाशाबा शेवते(राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेले अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष) असे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सायगाव गणात साक्षी विजय देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व चारुशीला विवेक पवार भाजपा यांच्यात सरळ लढत होत आहे.

        म्हसवे गटात संदीप सर्जेराव पवार (शिवसेना),वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे (भाजपा) संतोष दिनकर शिराळे ( अपक्ष) असे तीन उमेदवार आहे. म्हसवे गटातील राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.म्हसवे गणात – रेश्मा समाधान पोफळे (भाजपा), शिल्पा मिलिंद शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष), संगीता दिनकर भिसे (अपक्ष),  खर्शी बारामुरे गणात -विठ्ठल गुलाबराव गोळे (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ),गोरख सिताराम महाडिक (भाजपा) किरण हनुमंत गायकवाड (अपक्ष) उमेदवार आहेत. 

     कुसुंबी गटात कविता एकनाथ ओंबळे (शिवसेना) अर्चना ज्ञानदेव रांजणे (भाजपा) कल्पना गणपत पारटे (अपक्ष) हे तीन उमेदवार आहेत.आंबेघर तर मेढा गणात अतिश संतोष कदम (शिवसेना) व विजय बाबाजी सपकाळ (भाजपा) कुसुंबी गणात पुष्पा जगन्नाथ चिकणे (भाजपा) व सुनिता विलास दूंधळे (शिवसेना) यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे.

      आज अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून निवडणूक प्रचाराला वेग आला आहे.आतापासून आरोप प्रत्यारोपांच्या फायरी झडण्यास सुरुवात झाली आहे. नेते व उमेदवार एकमेकांवर तोंडसुख घेतील. परंतु निवडणूक निकाल लागल्यानंतर कोण कुणाशी युती करेल, कोण कोणाशी आघाडी करेल हे सांगता येत नाही. नेते संधी साधून एकत्र येतात हे राजकारणात अनेकदा घडलेले आहे व घडत आहेत त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांनी कोणतीही गोष्ट फार मनाला न लावून घेता संयमाने आपल्या नेत्यांच्या पाठीमागे उभे राहावे. यामध्ये आपल्या स्वतःला व आपल्या कुटुंबाला कोणतीही झळ पोहचू नये याची काळजी घ्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page