Tuesday, April 7, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोनाची घोडदौड सुरुच ; बाजारपेठांत जीवघेणी गर्दी.

जावली तालुक्यात कोरोनाची घोडदौड सुरुच ; बाजारपेठांत जीवघेणी गर्दी.

एकूण बाधित ५५९० , डिस्चार्ज. ४३००, मृत्यू. १३१, अॅक्टिव्ह ११५९

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात या आठवड्यात कोरोना रुग्ण वाढीने पुन्हा वेग घेतला आहे.शासनाच्या निर्बंधांमुळे बाजारपेठ केवळ सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरु रहात आहे.परंतू सकाळी नऊ ते अकरा या दोन तासात बाजारपेठेत या कोरोना महामारीच्या काळात होणारी गर्दी जीवघेणीच ठरत आहे.एकतर बाजारपेठ उघडी ठेवण्याची वेळ वाढवा अथवा आठ पंधरा दिवस सर्व कडेकोट बंद ठेवा असाच सूर आता जनसामान्यांतून उमटत आहे.

        जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.३० रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व अॅन्टीजेन टेस्ट मध्ये १३९ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तर दोन मृत्यूची नोंद झाली आहे.आज डिस्चार्ज देण्यात आले नाहीत.

       दि.३० रोजीच्या कोरोना चाचणीत मान्टी ६,वाघळी ५,आंबेघर त.मेढा २,आसणी ७,भोगवली त.मेढा १,बिभवी २,चोरांबे १,गवडी ७,केडंबे २,केळघर १०,मामुर्डी ४,मेढा ९,मुकवली २,रिटकवली २, सावली १,आंबेघर त.कुडाळ २, बामणोली तर्फे कुडाळ २, दापवडी ३,हातगेघर २, हुमगांव२,कावडी १, खर्शीबारामुरे १, कुडाळ १४,पिंपळी १,शेते २,सोमर्डी १,विवर १,करंदी त.मेढा १,कुसुंबी १,म्हाते बु. ४,मोहाट ९,पिंपरी तर्फे मेढा १,वागदरे १,आलेवाडी २,आनेवाडी १,भिवडी ३,दरे बु.२,दुदुस्करवाडी १,करंदी त.कुडाळ १,महिगांव ३ , मेरूलिंग. १,मोरघर १ ,रायगांव मृत्यू दि. २३/४/२१ ,सायगांव ४, सर्जापूर. ६, येरुणकरवाडी ३ एकूण १३९ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page