कुडाळ दि.१२- जावली तालुक्यात आठदिवस कोरोना बाधितांचा आकडा पंचवीसच्या आत रोखण्यात यश आले होते.परंतू आज कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.नवीन साखळ्या आकडे वाढवत आहेत.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि. १० रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.११ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ३७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.तालुक्यात २८५ अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;सावरी १, खर्शीबारामुरे १, कुडाळ १, म्हसवे ४, रांजणी १,दुंद १,कुसुंबी १,वागदरे ४,आनेवाडी १,बिभवी १, इंदवली ७,महिगांव २,मानकरवाडी १,नेवेकरवाडी ८, प्रभूचीवाडी १,सायगांव १ एकूण ३७.