;२४१७, डिस्चार्ज २३१४, बळी ६४,अँक्टिव्ह ३९
सूर्यकांत जोशी ;- जावली तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत कोरोना संसर्गाचा वेग मंदावला होता.परंतू आता पुन्हा कोरोना बाधितांच्या आकड्यांत वाढ होत असल्याने जनतेने अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मंगळवारी रात्री च्या अहवालात मेढा येथील चार जणांचा तर बुधवारी रात्री करंदी तर्फ मेढा येथील दहा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. अशी माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
गेल्या पंधरा दिवसांत दिवाळीच्या सणाच्या आनंदात सर्वजण व्यस्त होते. तर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी झाला होता. त्यामुळे या ब्लॉग वरुन दररोज प्रसिद्ध होणारे कोरोना बातमी पत्र प्रसिद्ध करण्यात येत नव्हते. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन सुरू झाल्यावर या ब्लॉग वरून दररोजच्या ताज्या व अचूक अपडेट्स जावलीतील जनते पर्यंत अव्याहत पोहचवल्या जात होत्या. त्यामुळे या ब्लॉग वरील बातमी पत्राला हजारोंच्या संख्येने जावलीतील जनतेचा प्रतिसाद मिळत होता व आहे.
या कामी जावलीचे तत्कालीन तहसीलदार शरद पाटील, विद्यमान तहसीलदार पोळ साहेब,गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते, तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले व लाभत आहे. आपल्याला तालुक्यातील कोरोना च्या दररोजच्या अपडेट्स मिळाव्यात यासाठी या ब्लागच्या माध्यमातून प्रयत्न आहे.