Sunday, April 5, 2026
HomeTop Newsपाचवडच्या जीवनप्रकाश हाॅस्पिटलमध्ये कोविड सेवेचा शुभारंभ ; वैद्यकीय सेवेत डॉ.ससाणे यांचे मौलिक...

पाचवडच्या जीवनप्रकाश हाॅस्पिटलमध्ये कोविड सेवेचा शुभारंभ ; वैद्यकीय सेवेत डॉ.ससाणे यांचे मौलिक योगदान आ.पाटील

*

कुडाळ – गेली ४० वर्षे सातत्याने वैद्यकीय सेवा करत असताना डॉ मनोहर ससाणे यांनी पाचवड येथील जीवनप्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रासाठी खूप मोलाचे योगदान दिले आहे, आज या हॉस्पिटलमध्ये कोविड विभाग सुरू होत असल्याने वाई तालुक्यातील कोरोना बाधितांना दिलासा मिळेल असे प्रतिपादन  वाई, महाबळेश्वर, खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. मकरंद (आबा) पाटील यांनी केले.

            पाचवड ता. वाई येथील जीवनप्रकाश हॉस्पिटल मध्ये कोविड विभागाच्या (DCHC) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, गेली दीड वर्षे आपण कोरोना या आजाराशी संघर्ष करत आहोत. या दुसऱ्या लाटेचा फटका तरुणांना पण बसत आहे. पाचवड हे मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. वाई, जावळी, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव तालुक्यातील नागरिकांचा नेहमी इकडे राबता असतो. त्या पार्श्वभूमीवर पाचवड येथे कोरोना सेंटरची आवश्यकता होती.

तालुक्याच्या ठिकाणी तसेच तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या मोठ्या गावात कोरोना सेंटर्स उभी राहिली तर ज्या, त्या तालुक्यातील, भागातील रुग्णांची जवळच सोय होईल आणि परिणामी जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलवरील अतिरिक्त ताण कमी होईल. दुसरी लाट आटोक्यात आणण्याचा आम्ही जबरदस्त प्रयत्न करीत आहोत. तिसरी लाट येऊ नये अशीच आपली इच्छा आहे. पण दुर्दैवाने आलीच तरी आपण सतर्क असायला हवे. त्यादृष्टीने डॉ मनोहर ससाणे यांनी कोरोना सेंटर्स चालू करण्याचा घेतलेला निर्णय एकदम स्तुत्य आहे. त्यासाठी त्यांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. कोरोना सेंटर चालवताना त्यांना आवश्यक ते सहकार्य लागल्यास डॉक्टरांनी जरूर सांगावे, त्यांना सर्वोतोपरी मदत करू असेही आ. पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी बोलताना डॉक्टर मनोहर ससाणे यांनी जीवनप्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्याप्रमाणे रुग्णांना उत्तम सेवा दिली त्याचप्रमाणे यापुढेही सेवा देण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी डॉ मनोहर ससाणे, डॉ स्नेहा जमदाडे, डॉ विदुला रणदिवे, किशोर बोराटे, पाचवड येथील ग्रामस्थ सर्वश्री अशोक गायकवाड, मोहन चव्हाण, ग्रामसेवक चव्हाण अण्णासाहेब, नरेंद्र बाबर, अनिल निकम तसेच सुनिल पिसाळ, विशाल भोसले तसेच हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page