एकूण : बाधित ७१२५, डिस्चार्ज ६२८९, मृत्यू १८३, अॅक्टिव्ह ६५३
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात काल शंभरी पार केलेल्या कोरोनाची आज अर्ध शतका पर्यंत घसरण झाली. बुधवारचा अपवाद वगळता जावली तालुक्यात या आठवड्यात कोरोनाला ओहोटी लागली असल्याचे दिसून येत आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.१९ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ५१ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.बाधितांपेक्षा डिस्चार्ज अधिक होत असल्याने तालुक्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे.तालुक्यात १मे रोजी १०२२ इतके अॅक्टिव्ह रुग्ण होते.सध्या ६५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; आंबेघर तर्फे मेढा ४, भणंग १,मेढा १,पुनवडी १,घोटेघर ३,हुमगांव १, कुडाळ ३,महू १,दिवदिववाडी ९,म्हाते बु.१, पिंपरी तर्फे मेढा १,आनेवाडी ८,भिवडी ५,दरे बु १, इंदवली १, प्रभूचीवाडी २,सायगांव १, सांगवी तर्फे सोनगाव ६, सोनगाव १. एकूण ५१.
